Tuesday, September 17, 2024

उबाठा गटाचे आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर दौ-याला वादाची किनार

Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसांचा संभाजीनगर दौरा वादात सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर भाजपाकडून आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्यासमोर आंदोलन केले. तर ठाकरे पैठणमध्ये असताना आंदोलकांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ठाकरे यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांच्या गर्दीतून वाट करून त्यांची सुटका केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला राजकीय फायदा झाला होता. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या सर्व पैसे सर्वपक्षीय बैठकीत महाविकास आघाडीचे नेते गेले नाहीत याचा राग मराठा समाजामध्ये आहे. धाराशिवच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही मराठा आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्याला सामोरे जावं लागलं होतं. आजच्या स्वाभिमान सभेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न होता परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वातावरण अधिक तापले होते.

अन्य लेख

संबंधित लेख