Saturday, September 7, 2024

“पवार साहेब म्हणतील, तेच उद्धवजी करतील”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Share

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असं मला वाटत नाही, असे अजित पवार म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. “अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात मला माहिती नाही. पण, मी उद्धव ठाकरेंना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवार साहेब आहेत. पवार साहेब जे म्हणतील, तेच उद्धवजी करतील”, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांचाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं म्हटल्यावर अजित पवार म्हणाले, मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसमध्ये विलीन करतील. उपमुख्यमंत्री म्हणून मी उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळून पाहिलं आहे. मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळायची. मी त्यांचा स्वभाव जो पारखलाय किंवा त्यांची कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील, पक्ष विलीन करण्याचा असं मला अजिबात वाटत नाही,” असं अजित पवार म्हणाले होते.

अन्य लेख

संबंधित लेख