Monday, June 24, 2024

उधोजीराव, या १० प्रश्नांची उत्तरे द्या !

Share


प्रिय उधोजीराव,

१) शिवसेना भवनवर फडकत असलेला भगवा ध्वज कशाचे प्रतीक आहे? `माझा तो ध्वज, दुसऱ्याचे ते फडके’, हा विचार हिंदूहिताचा आहे का?

२)  आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे कायम स्मरण करता. १०५ हुतातम्यांचीसुद्धा आपल्याला प्रत्येक निवडणुकीमधे आठवण येते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन प्रसंगी गोळीबार झाला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. सध्या आपण काॅंग्रेससबरोबर हातमिळवणी केली आहे. आपली ही भूमिका महाराष्ट्रविरोधी नाही का?

३)  आपण सध्या आपल्या वडीलांप्रमाणे हातामधे रुद्राक्षाची माळ घालता. ही कृती केवळ प्रतीकात्मक आहे का? आपल्याला बाळासाहेबांच्या `जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधुंनो, भगिनींनो आणि मातांनो’ या भाषण प्रारंभ परंपरेचा विसर का पडला?

४)  गेली कित्येक वर्षे मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात आहे. मुंबईच्या आजच्या दुर्दशेला आपल्याला जबादबदार धरले जाते. आपले या विषयावर मत काय?

५)  काॅंग्रेसचे अल्पसंख्य समाजाबाबतचे धोरण सर्वज्ञात आहेत. आपणास ही धोरणे मान्य आहेत का?

६)  आपले कुटुंब सदस्य आणि नातेवाईक पक्ष आणि सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करीत होते, असा आरोप आहे. आपला त्यावरील खुलासा काय?

७)  पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळण्यापूर्वी आपण पक्षासाठी आणि मराठी माणसासाठी नेमके काय केले?

८)  बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेचे पद उपभोगले नाही. आपण स्वतः आणि आपले पुत्र यांनी निवडणूक लढवून ही परंपरा खंडित केली का? आपण स्वतः मुख्यमंत्री आणि आपले पुत्र मंत्रिमंडळात होतात. गांधी परिवारवादाच्या विरोधात कडक भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांच्या विचाराशी हा द्रोह नाही का?

९)  ऑगस्ट २००५ मधे सारी मुंबापुरी पावसाच्या पाण्यात बुडून गेली होती. तेव्हा आपण काय करीत होता?

१०) मुख्यमंत्रीपदावर असताना मंत्रालयात न जाता ऑनलाइन कारभार करण्याच्या आपल्या पद्धतीवर कायम टीका केली जाते. यावर आपले मत काय?

अन्य लेख

संबंधित लेख