Monday, July 7, 2025

मेट्रो 3 स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Share

ठाणे : मेट्रो ३ (Metro 3) स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असून, त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवून सेवा रविवार पासून सुरु होणार असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ठाण्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. “नवरात्रोत्सव सुरु आहे, मोदीजी नऊ दिवस उपवास करत फक्त पाणी घेतात आणि आई महिषासुरमर्दिनीची आराधना करतात. महाविकास आघाडी सरकारने मेट्रो ३ प्रकल्पाला स्थगिती दिली होती. हजारो कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प थांबवला गेला. कोणाचातरी इगो दुखावल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, ही पर्यावरणाची साथ देणारी मेट्रो आहे. पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे. तरीही दर्दैवाने उद्धव ठाकरे यांचा काय इगो दुखावला माहिती नाही पण त्यांनी याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने येताच मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आणि याचा मला खूप आनंद आहे,” असे फडणवीस म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख