Monday, October 7, 2024

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली; उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय

Share

महाराष्ट्र : “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” असं म्हणत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. यावरून आता राजकारण तापलं आहे. “सत्तेसाठी लाचार झालेल्या उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय झाले आहे”, असा सणसणीत टोला महाराष्ट्र भाजपच्या (Maharashtra BJP) सोशल मीडियावरून उद्धव ठाकरेंना लागवण्यात आला आहे.

दरम्यान, “भगवा ध्वज उध्दव ठाकरे साठी फडकं झाला…, सत्तेसाठी लाचार झालेल्या उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय झाले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भगव्या समोर मुघली सैतान झुकवले, अहद तंजावर तहद पेशावर हाच भगवा फडकला. समस्त हिंदूंचे संघटन याच एका भगव्याच्या छायेत होत आहे..!”, असल्याचं ठणकावून सांगितलं.

तसेच, स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या टीपू सेनेच्या प्रमुखाने आपले ध्वज बदलले आहेत मात्र आम्हा हिंदूंच्या शौर्याचे प्रतीक हा भगवा ध्वज आहे. हल्ली ज्याचे स्वागत पाकिस्तानी हिरव्या झेंड्याने होते त्याला काय कळणार भगव्याचे शौर्य…!”, अश्या शब्दात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख