Monday, June 24, 2024

उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

Share

उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

म्हणे फडके संघाचे भगवे निशाण!

फडके नव्हे रे ही भगवी ज्वाला!

हिंदुत्वाचा हा धगधगता अभिमान!

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

हिंदवी स्वराज्याचा हाच मानबिंदू

सोडून लाज झालास कसा बेईमान?

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

लुटले किती, पाडली राऊळे-मंदिरे

भगव्यासह उठला अवघा हिंदुस्थान

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

वारकऱ्यांची पवित्र भगवी पताका

सुडाग्नीत तिचा केलास अपमान

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

नभातुनि गड-किल्ले टिपताना

नाही दिसले शिवबाचे हे स्फुर्तिस्थान?

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

मक्तेदारी फक्त नसे ही संघाची

हिंदूंचे असे धडधडते हृदयस्थान

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

करंटा पुत्र तोडतो अकलेचे तारे

पिता म्हणे, माझी लाज राख किमान

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

‘बारामती’ने केली तुझी मती गुंग

‘तुतारीवाल्यां’चे हे मोठे कारस्थान

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

‘मशाल’ ही तुझी कायमची विझणार

जनता दाखवेल आता तुला आस्मान

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

तिरंग्यापुढे सदैव नतमस्तक आम्ही

संघस्थानी भगवाही असे अमुचा प्राण

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

संघाचाच नसे सर्वांचाच हा भगवा

प्राणपणाने राखू त्याच्याशी ईमान!

…उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

अन्य लेख

संबंधित लेख