Saturday, July 27, 2024

मतदार जागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करूया

Share

“स्वतः मतदान करणे आणि इतरांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणे म्हणजे एक प्रकारची देशसेवा आहे.” मतदार जागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येईल. नेमकं काय करायचं हा प्रश्न पडलाय का ?

  • फक्त तुमच्या एन जी ओ च्या सोशल मिडीयाचा वापर करायचा आहे. आता तो कसा करायचा हा प्रश्न जर पडला असेल तर त्याचं उत्तरदेखील अगदी सोपं आहे.
  • तुम्हाला एक एन जी ओ कीट मिळेल त्यामधील सोशल मिडियाद्वारे शेअर करता येणाऱ्या घटकांचा वापर करायचा आहे. व्हॉट्सॲप डीपी अर्थात डिसप्ले पिक्चरच्या माध्यमातून तुमचा फोटो टाकून मतदान करण्याचे आवाहन करा. व्हॉट्सॲप डीपी कसा बदलायचा त्यासाठी खालील व्हिडीओ पाहा.
  • फेसबुक कव्हर पेज तयार करून मतदानासाठी जागृती करणे. फेसबुक कव्हर पेज कसे तयार करावे यासाठी खालील व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येईल.
  • फेसबुक प्रोफाईल पिक्चर फ्रेम तयार करुन मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. फेसबुक प्रोफाईल पिक्चर फ्रेम खालीलप्रमाणे तयार करा.
  • ट्विटर कव्हर इमेज तयार करुन मतदान करण्यासाठी जनजागृती करा. ट्विटर कव्हर इमेज खालील व्हिडीओ बघून तयार करा.
  • GIF ॲनिमेशनचा वापर करता येईल. GIF ॲनिमेशन फक्त डाऊनलोड करा आणि इतरांना फॉरवर्ड करा.
  • ट्विटर प्रोफाईल पिक्चर तयार करुन मतदान करण्यासाठी जनजागृती करा.ट्विटर प्रोफाईल पिक्चर खालील व्हिडीओ बघून तयार करा.
  • लिंक्डइन प्रोफाईल पिक्चर पेजच्या माध्यमातून मतदानासाठी प्रोत्साहित करा. लिंक्डइन प्रोफाईल पिक्चर खालील पद्धतीने तयार करा.

आता वाटतय ना तुम्ही पण या उत्सवाचे सुवाहक आहात…… आता आणखी काय करता येईल?

सोप्पं आहे……तुमच्या संस्थेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे त्यांना त्यांच्या सोशल मिडियावर या वरील गोष्टींपैकी जास्तीत जास्त गोष्टींचा वापर करून त्यांच्या स्वतःच्या फोटोसह , कुटुंबाच्या फोटोसह वापर करण्यास प्रेरित करायचं आहे. तुमच्याकडे येणाऱ्या विविध पोस्ट्सचे schedule तयार करा. मतदानाच्या दिवसापर्यंत मतदानाबाबतच्या पोस्ट्सचेदेखील नियोजन करा. खालील सोशल मीडिया हँडलला फॉलो करा आणि आपले मित्र, नातेवाईक यांच्याशी शेअर करा. लक्षात घ्या ……हा उत्सव आपला आहे ….उत्सव आनंदी करण्यासाठी आणि मतदार जागृतीसाठी तुम्हाला पाहिजे असं वातावरण करण्यासाठी या एन जी ओ कीटचा वापर करा.

अन्य लेख

संबंधित लेख