Sunday, December 22, 2024

Wardha: वर्ध्यात पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याची जय्यत तयारी

Share

वर्धा (Wardha) येथे २० सप्टेंबर २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेचा वर्षपूर्ती सोहळा होणार आहे. प्रशासनाकडून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमीपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभदेखील मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेचे यश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण दालनाची निर्मिती करण्यात आली असून देशभरातील विविध कारागिरांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा यामध्ये समावेश राहणार आहे. हे प्रदर्शन समारंभानंतर दोन दिवस जिल्ह्यातील आणि विदर्भातील सर्व नागरिकांसाठी खुली राहणार आहे. कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी कारागिरांशी संवाद साधणार आहेत. तसेच मोदी जनसभेलादेखील संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचे देशभरात ७०० ठिकाणी प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्री उपस्थित राहणार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख