Tuesday, August 18, 2026

ऋषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी …100 सिक्स ठोकणारा पहिला फलंदाज

Share

गॉल येथे सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत आज श्रीलंका संघाविरुध्द   पहिल्या कसोटी सामन्याच्या  चौथ्या दिवशी भारताच्या डावात दुसरा षटकार ठोकताच ऋषभ पंतने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.  

टीम इंडियाचा युवा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक  ॲडम गिलक्रिस्ट याच्या नावावरील विक्रमाशी बरोबरी  साधली.  आणि  इतिहास घडवला आहे. पंतने दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी साकारली. पंतने षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे. पंतने या सिक्ससह वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पंत टेस्ट क्रिकेटमध्ये वेगवान 100 सिक्स ठोकणारा पहिलाच आणि एकूण चौथा बॅट्समन ठरला आहे. पंतने याबाबतीत ॲडम गिलख्रिस्ट याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच पंतने टेस्टमध्ये सिक्सची ‘सेंच्युरी’ करणारा पहिला भारतीय हा बहुमानही मिळवला आहे.

पंतने दुसऱ्या डावात 69 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 66 धावांची खेळी साकारली. पंतने लहीरु कुमारा याने टाकलेल्या डावातील 37 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार लगावला. पंतने यासह 100 वेगवान कसोटी षटकार पूर्ण करत कारकीर्दीतील 20 व्या अर्धशतकांचा टप्पा गाठला आहे.

ऋषभ पंत च्या या वादळी आणि अर्धशतकी खेळीमुळे भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात तीनशेहून अधिक धावांचे भक्कम आघाडी मिळवली असून सामन्यावरील पकड अधिक मजबूत केली आहे. कसोटीच्या चौथ्या डावात एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक मानले जाते भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर संघ या गॉल कसोटीत विजयाची नोंद करण्याच्या जवळ पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू आहे.

वीरेंद्र सेहवागला : आतापर्यंत भारताकडून एकाही फलंदाजाला कसोटीत षटकारांचा शतकी डाव साकारता आला नव्हता. पंतआधी भारतासाठी माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने सर्वाधिक 91 षटकार लगावले होते.

कसोटीत 100 षटकार लगावणारे फलंदाज

बेन स्टोक्स : 138

ब्रँडन मॅक्युलम : 107

ऋषभ पंत : 100

ॲडम गिलख्रिस्ट : 100

अन्य लेख

संबंधित लेख