आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या पुरुष क्रिकेट फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे.
प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि तीलक वर्मा यांच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानी संघाचा १९ धावांनी पराभव केला.
जपानमधील कोरोगा स्पोर्ट्स पार्कवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, भारताने पाकिस्तानवर १९ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २११-६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला भारताच्या गोलंदाजांनी २० ओव्हरमध्ये १९२-६ धावांवरच रोखले.
भारताच्या २१२ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर पत्त्यांसारखा कोसळला. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी सुरुवातीलाच अचूक मारा करत पाकिस्तानवर दबाव आणला. तर अक्षर पटेलने महत्त्वाची विकेट काढली. सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने सीमारेषेवर अद्भुत रिले कॅच घेतला.
या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा ६१ धावा, तिलक वर्मा नाबाद ५१ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तान संघाच्या हसन नवाज आणि सैम अयूब यांनी ५३ चेंडूंमध्ये ८९ धावांची भागीदारी करत चुसर निर्माण केली होती. पण शिवम दुबे याने ही जोडी तोडली. सैम अयुबचा बाउंड्री लाईनवर वॉशिंग्टन सुंदरने घेतलेल्या कडक कॅचनंतर पाकिस्तानवर दबाव वाढला.