Wednesday, December 4, 2024

कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी फंडाची स्थापना सरकारकडून 750 कोटींचा निधी

Share

कृषी स्टार्टअपला (Agriculture startup) प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या साठी सरकारनं 750 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कृषी स्टार्टअप्सना आर्थिक मदत देण्यासाठी ‘कृषी’ फंड सुरु करण्यात आला आहे

Agritech स्टार्टअप्सना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी 750 कोटी रुपयांचा ‘AgriSure’ निधी स्थापन केला आहे. सरकारने 14,000 कोटी रुपयांच्या सात कृषी योजनांना मंजुरी दिली आहे. कृषी निवेश आणि ‘ऍग्रीशुअर’ फंड या एकात्मिक कृषी गुंतवणूक पोर्टलच्या शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंत्री बोलत होते. 750 कोटी रुपयांचा ‘AgriSure’ फंड स्टार्टअप्स आणि ‘कृषी-उद्योजकांना’ इक्विटी आणि कर्ज भांडवल प्रदान करेल.

शिवराज सिंह चौहान यांनी स्टार्टअप्सना या निधीचा वापर करण्यास सांगितले आहे. ॲग्रीटेक स्टार्टअपसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. शेतीमध्ये केवळ सरकारीच नव्हे तर खासगी गुंतवणुकीची गरज आहे. या क्षेत्रात उत्पादन आणि मूल्यवर्धन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोगांची गरज असल्याचे चैहान म्हणाले

अन्य लेख

संबंधित लेख