Saturday, November 23, 2024

आता वेबसाईटवरील मजकूर वाचण्याऐवजी ऐका: अँड्रॉइड ने आणले Listen To This Page वैशिष्ट्य

Share

गुगलने त्यांच्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी “हे पृष्ठ ऐका” (Listen To This Page) हे नवे वैशिष्ट्य जारी केले आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीच्या भाषेत आणि आवाजात वेब पेज ऐकण्याची संधी मिळते. हे अपडेट, लवकरच गुगल क्रोम च्या सर्व स्थिर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सध्या हिंदी आणि बंगाली या भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच अन्य भारतीय भाषांमध्ये सुद्धा हे वैशिष्ट्य पाहावयास मिळेल अशी अपेक्षा आहे.

या वैशिष्ट्यात प्रवेश करण्यासाठी, Chrome Android ॲपमध्ये भाषांतर पर्यायाच्या अगदी खाली, तीन-बिंदू मेनूमध्ये “हे पृष्ठ ऐका” वर क्लिककरून स्क्रीनवर असलेल्या वेबपेजवरील मजकूर तुम्हाला पॉडकास्ट सारख्या शैलीमध्ये ऐकता येईल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्ले करू शकता, थांबवू शकता, रिवाइंड करू शकता, फास्ट फॉरवर्ड करू शकता तसेच १० सेकंद वेळ स्किप करून पुढे जाऊ शकता.

सध्या वेबपेजवरील मजकूर ऐकण्यासाठी चार आवाज पर्याय उपलब्ध आहेत: रुबी (मध्य-पिच, उबदार), रिव्हर (मध्य-पिच, चमकदार), फील्ड (लो-पिच, ब्राइट), आणि मॉस (लो-पिच, शांत). तुम्ही इंग्रजी, हिंदी, बंगाली, अरबी, चीनी, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, जपानी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश यांसारख्या भाषांमधून ऐकण्याचा पर्याय निवडू शकता.

तथापि, सर्व वेब पृष्ठे या वैशिष्ट्यास अजून अनुकूल नाहीत. एखादी वेबसाइट या वैशिष्ट्यास अनुकूल नसल्यास, तीन-बिंदू मेनूमध्ये “हे पृष्ठ ऐका” पर्याय दिसणार नाही. पूर्वी, वापरकर्ते Google असिस्टंटला व्हॉईस कमांड देऊन पेज ऐकू शकत होते. नवीन “हे पृष्ठ ऐका” (Listen To This Page) वैशिष्ट्यासह, वापरकर्त्यांकडे भाषा, आवाज आणि अधिक सानुकूलित पर्याय आहेत. 9to5Google या तंत्रज्ञान विषयक बातम्यांच्या वेबसाईटने ने हे वैशिष्ट्य सर्व प्रथम Android Chrome ॲपच्या आवृत्ती 125 मध्ये पाहिले.

हे वैशिष्ट्य तुमच्यासाठी उपलब्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी, तुमचे ॲप अपडेट करा आणि ते तीन बिंदूंच्या मेनूमध्ये शोधा. iOS वापरकर्त्यांकडे Safari वेब ब्राउझरमध्ये हे “Listen to Page” वैशिष्ट्य आधीपासूनच आहे, जिथे ते Siri च्या आवाजात वेब पेज ऐकू शकतात.

अन्य लेख

संबंधित लेख