मुंबई : गेल्या दोन वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
२७ जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. हे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या सरकारच्या काळातील हे शेवटचे अधिवेशन होते. राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना सुरु केल्या. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’, अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची योजना, तीन गॅस सिलेंडर देण्याची योजना आणि युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत १० लाख सुशिक्षित युवकांना १० हजार रुपये स्टायपेंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे समाजातील विविध घटक सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच, मंत्रिमंडळातील सहकारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांच्या सहकार्याने हे अधिवेशन सुरळीतपणे पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.
- 27 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘स्वामित्व योजने’चा शुभारंभ होणार
- पूंछ येथे रस्ते अपघातात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून १ कोटींची मदत जाहीर
- ‘वीर बालदिवस’ निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे गुरु गोविंद सिंहजी यांच्या साहिबजाद्यांना विनम्र अभिवादन
- अटलजींच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आदरांजली
- पुण्यात उद्योगांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उदय सामंत यांचे निर्देश