आसाम : आसाममधील (Assam) अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी तफ्फजुल इस्लामचा आज पहाटे पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जीवघेणा अंत झाला. प्रकरणातील आरोपीला पोलीस तपासासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आलेल्या जवळच्या तलावात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर ही घटना घडली. दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर आरोपी तफ्फजुल इस्लामचा मृतदेह सापडला.
तफ्फजुल इस्लाम एका जघन्य प्रकरणातील मुख्य आरोपी होता. गुरुवारी संध्याकाळी तीन आरोपींनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. पीडित मुलगी ट्यूशनवरुन परत येत असताना तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी तफ्फजुल इस्लाम बोरभेटी गावचा राहणारा होता. गावकऱ्यांनी त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी न होण्याचा आणि गावच्या कब्रस्तानात त्याच्या दफनविधीसाठी जागा द्यायची नाही असा निर्णय घेतला आहे.