Sunday, November 24, 2024

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली – खा. श्रीकांत शिंदे

Share

विरोधकांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसते त्यामुळेच काही झालं तरी ते राजकारणच करत आहे. कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नसल्याने ते राजकारण करून जनतेच्या मनामध्ये द्वेष निर्माण करीत असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना केला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे काल नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्ह्यातील विधानसभा निहाय पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी एक्सप्रेस इन हॉटेल येथे संवाद साधत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी येणाऱ्या निवडणुकीत काय रणनीती असली पाहिजे याबाबत त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी बोलताना डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की, पक्ष पातळीवर ती सर्व विभागांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपला उमेदवार हा कसा निवडून येईल या दुसरी कोणातून प्रयत्न केले पाहिजे. महायुतीचा विजय हा झालाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करत केले पाहिजे. त्यासाठी आपले मतभेद हे बाजूला ठेवा. तुमचे काय मतभेद असतील ते मला सांगा मी तुमचे मतभेद दूर करतो. पण महायुतीचा उमेदवार हा विजय झालाच पाहिजे, असे त्यांनी ठणकावून यावेळी सांगितले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, राज्यामध्ये महायुती सरकारने ज्या काही योजना आणल्या आहे त्या कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन महायुतीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी या वेळेस व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या वरती जोरदार हल्ला चढविला आहे. आजपर्यंत त्यांनी कधीच चांगले काम केलेले नाही त्यामुळे त्यांना कुठलेही चांगले काम दिसत नाही. त्यांना सर्वत्र राजकारण दिसते. त्यामुळे त्यांची परिस्थिती अशी असल्याचेही ते सांगताना पुढे म्हणाले की, विरोधकांना कोणत्याही गोष्टींमध्ये राजकारण दिसतं नको तिथे राजकारण करत आहे. कारण त्यांना आता लोकसभा निवडणुकीमध्ये केलेले प्रयोग विधानसभा निवडणुकीमध्ये उपयोगात येणार नाहीत. याची पूर्णपणे शाश्वती झाल्यामुळे राजकारण करून राज्यातील जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम ते करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अन्य लेख

संबंधित लेख