केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. ३०९ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय १३ हजार ९६६ कोटी रुपयांच्या कृषी क्षेत्रातल्या सुधारणांच्या योजनांना मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत ही बैठक झाली. यामुळे १ हजार गावे आणि या भागातील ३० लाख नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (The Cabinet Committee on Economic Affairs – CCEA) इंदूर आणि मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित केले आहेत. यासाठी १८ हजार ३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता सुधारेल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या व्हिजनच्या अनुषंगाने असून या प्रकल्पामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील असा दावाही करण्यात आला आहे.