Tuesday, November 26, 2024

कोल्हापूर: १९ लाख २१ हजार मतदार; शहरी ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश

Share

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. यातील एक मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा हा आहे. राज्यात या मतदारसंघाचा ४७ वा क्रमांक येतो. महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे काॅंग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. महायुतीकडून शिवसेनेच्या (शिंदे गट) चिन्हावर प्रा. संजय मंडलिक येथे निवडणूक लढवत आहेत. या लोकसभा मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण १९ लाख २१ हजार ९३१ मतदार आहेत. यामध्ये ९ लाख ७७ हजार ७१० पुरुष आहेत. तर ९ लाख ४४ हजार १३२ स्त्रिया आहेत. ८९ तृतीयपंथी मतदार आहेत. कोल्हापूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा आहे. या मतदारसंघाची एकूण मतदार संख्या ही ३ लाख ४४ हजार ६५९ इतकी आहे. कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ सर्वात लहान असून तेथे एकूण मतदारांची संख्या २ लाख ८९ हजार ९७६ इतकी आहे.

विधानसभा निहाय मतदार
चंदगड विधानसभा मतदारसंघात १ लाख ५८ हजार ९७४ पुरुष मतदार आहेत. तर १ लाख ५७ हजार २१८ स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या ८ आहे. एकूण मतदारांची संख्या ३ लाख १६ हजार २०० इतकी आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार यांची संख्या १ लाख ७२ हजार ३८४ इतकी आहे. स्त्री मतदारांची संख्या १ लाख ६० हजार ३६१ इतकी आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या १४ इतकी आहे. एकूण मतदारांची संख्या ३ लाख ३२ हजार ७५९ एवढी आहे.

कागल विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ६४ हजार ७३७ इतकी आहे. १ लाख ६२ हजार ८३७ इतक्या स्त्री मतदारांची संख्या आहे. या मतदारसंघात ५ मतदार तृतीयपंथी आहेत. मतदारांची एकूण संख्या ३ लाख २७ हजार ५७९ इतकी आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ७५ हजार ५४२ एवढी आहे. स्त्री मतदारांची संख्या १ लाख ६९ हजार ७२ एवढी आहे. या मतदारसंघात ४५ मतदार तृतीयपंथी आहेत. विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या ही ३ लाख ४४ हजार ६५९ इतकी आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदार १ लाख ६२ हजार ७३ एवढे आहेत. तर स्त्री मतदारांची संख्या १ लाख ४८ हजार ६८५ इतकी आहे. या मतदारसंघात एकही मतदार तृतीयपंथी नाही. विधानसभा क्षेत्राची एकूण मतदार संख्या ३ लाख १० हजार ७५८ इतकी आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्णपणे शहरी मतदारसंघ आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ४४ हजार इतकी आहे. स्त्री मतदारांची संख्या १ लाख ४४ हजार ९५९ इतकी आहे. विधानसभा मतदारसंघात १७ मतदार तृतीयपंथी आहेत. एकूण मतदारांची संख्या २ लाख ८९ हजार ९७६ इतकी आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्री जाधव या काँग्रेसच्या आमदार आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघात पी.एन. पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आहेत. कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख