Saturday, October 19, 2024

नंगारा वास्तू संग्रहालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; नगारा वाजवण्याचा लुटला आनंद

Share

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवारी सकाळी केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नगारा वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, येणार्‍या काळात ही संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय व्हावी यासाठी आमचे सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नंगारा भवनात पंतप्रधान मोदींसमारे बंजारा समाजाच्यावतीने परंपरागत नृत्य देखील सादर करण्यात आले. बंजारा नृत्य व संग्रहालयाचे मोदींनी अवलोकन केले.

श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवन हे भव्य संग्रहालय उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवी येथील मॉ जगदंबा देवीच्या मंदिराला भेट देऊन पंतप्रधान मोदींनी दर्शन घेतले. संत श्री सेवालाल महाराज, संत श्री रामराव महाराज यांच्या समाधीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले. नंगारा वास्तू संग्रहालयाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण झाल्याने हे संग्रहालय केवळ महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारतासाठी एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र बनले आहे. या सोहळ्याला बंजारा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम आणि परंपरागत नृत्यही सादर करण्यात आले, ज्यामुळे संस्कृतीचे समृद्ध आणि रंगीत पहून घेण्याचा अनोखा अनुभव उपस्थितांना मिळाला.

अन्य लेख

संबंधित लेख