दि: ०६/१०/२०२४ रोजी, अखिल आनंद नगर नवरात्र उत्सव मंडळातर्फे, वैचारिक प्रबोधन उपक्रमा अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी श्री श्रीपाद श्रीकांत रामदासी यांनी हिंदुत्व या विषयाची मांडणी केली.
हिंदू म्हणजे नेमके कोण ? त्यांची धार्मिक, वैचारिक, राजकीय, सामाजिक दृष्टिकोनातून नेमकी व्याख्या काय ? हिंदुत्व म्हणजे नेमके काय ? दैनंदिन व्यवहारात हिंदुत्वाचा अवलंब कसा करावा ? आदी मुद्द्यांवर प्रबोधन करण्यात आले.
हिंदू व्यापारी, व्यवसायिक, उद्यमी यांचे अर्थकारण मजबुत करणे हे देखील राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे असेही मत रामदासी यांनी मांडले.
आगामी निवडणुकांमध्ये हिंदूंचे १००% मतदान होईल असा संकल्प देवी समोर सोडण्याचे आवाहन रामदासी यांनी केले.
उपस्थित मंडळाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद यांचे पदाधिकारी, आणि मा. उपमहापौर श्री प्रसन्नदादा जगताप यांच्या हस्ते देवीची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.