Sunday, November 24, 2024

रणशिंग फुंकले…भाजपाची मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक

Share

भारतीय जनता पार्टीच्या (Bhartiya Janata Party) मध्यवर्ती निवडणूक समितीची (Election Committe) बैठक काल संध्याकाळी नवी दिल्लीत पार पडली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1846584970598334924

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात जिल्हयाजिल्ह्यात प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज होत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणूक तयारी आढावा बैठका घेतल्या जात आहेत. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांना बॅनर, फलक तातडीनं काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी C-VIGIL ऍपवर नोंदवू शकतात, अशी माहिती महाराष्ट्राचे अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी काल मुंबईत  वार्ताहर परिषदेत दिली.

अन्य लेख

संबंधित लेख