Wednesday, October 23, 2024

घुसखोरी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातून भूमिका व्यक्त करावी : संपादक सुरेश चव्हाणके

Share

कोल्हापूर (प्रतिनिधी): सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरी विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय प्रवक्ते आणि सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. कोल्हापुरातील कळंबा येथे शिव प्रेरणा यात्रेअंतर्गत थेट मतदार संपर्क आणि विविध सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. “प्रबोधन मंच” व “सकल हिंदू समाज” यांच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले होते.

निवडणूक आयोगाने वोट जिहाद संदर्भात आत्ता भूमिका घेतली असली तरीही वीस वर्षापासून आपण यावर या संदर्भात जनजागरण करीत आहोत. नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी वेळी प्रकर्षाने वोट जिहादची तीव्रता आणि त्याचे परिणाम प्रथमच निवडणूक आयोगासह सर्वांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेला आला आहे. असेही त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. केवळ निवडणुकीपुरती नव्हे तर बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजाने नेहमी संघटित राहून सामूहिक स्वरूपात आपल्यावर आगामी काळात येणाऱ्या संकटांविषयी सजगतेने कार्यरत राहणे ही काळाची गरज आहे असे मत चव्हाणके यांनी व्यक्त केले. शेवटी आगामी निवडणुकांमध्ये “हिंदू जाहीरनामा” तयार करून तो सर्व पक्षांसमोर हिंदुत्ववादी संघटनांनी राष्ट्रीय भूमिकेतून ठेवावा व त्याविषयी पक्ष व उमेदवारांची भूमिका जाहीर करुन घ्यावी. हिंदू बहुल असणाऱ्या समाजाच्या हितासाठी याची दखल सर्व राजकीय पक्ष घेतील यासाठी व्यापक प्रमाणात प्रबोधन करावे असे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले. प्रारंभी त्यांचे महालक्ष्मी प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रबोधन मंचचे सुनिल वांकर, अनिरुध्द कोल्हापुरे, संग्रामसिंह निकम, सुनिल वाडकर, गजानन तोडकर, दीपक देसाई, उदय भोसले, प्रसन्न शिंदे, सुरज लोहार, नंदकुमार दिवटे, गंगाराम येडगे, निरंजन शिंदे, राजू तोरस्कर, विकास जाधव यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख