Thursday, October 24, 2024

विधानसभेची रणधुमाळी…एकच जाहीरनामा, एकत्रित प्रचार – अमित शहा यांनी दिले बळ

Share

विधानसभेची रणधुमाळी पुढे चालली आहे. आगामी रणनिती ठरवण्यासंदर्भात अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. दरम्यान हाच तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांची दिल्लीत भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. यात शाहांनी बंडखोरी रोखणे, महायुतीचा एकच जाहीरनामा, तिन्ही पक्ष एकत्रित प्रचार करतील अशा महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये शाहांनी भाजप नेत्यांना दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले की, ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही असे इच्छूक बंडखोरी करण्याची शक्यता आहे. अशा इच्छुकांकडून होणारी बंडखोरी टाळण्यावर भाजपचा भर असणार आहे. त्यानुसार पक्षातील बंडखोरी टाळण्यावर राज्यातील भाजप नेत्यांनी भर द्यावा.

अन्य लेख

संबंधित लेख