Saturday, October 26, 2024

विधानसभा निवडणूक २०२४ : महायुतीच्या २७७ जागांवर एकमत! उर्वरित निर्णय दोन दिवसांत

Share

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीची धामधून सुरु सुरु झाली आहे. भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की महायुतीमध्ये २७७ जागांवर सहमती झाली असून उर्वरित जागांबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाईल. भाजपाच्या दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीकडून मंजुरीनंतरच प्रकाशित होईल, त्यामुळे इच्छुकांनी अर्ज भरू नये, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सुचवले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील सुमारे १३ ठिकाणी सभा आयोजित करण्यात येणार आहेत. यापैकी मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड आणि धुळे या ठिकाणांचा निर्णय झाला असून, इतर ठिकाणांचे लवकरच ठरवले जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. नवाब मलिक यांच्याबाबतचा निर्णय अजित पवार घेतील. आमदार रवी राणा आपल्या युवा स्वाभिमानी पक्षातच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपाच्या संपर्कात असून, सुधीर मुनगंटीवार त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतील. आर्णीचे माजी आमदार राजू तोडसाम आणि मूर्तीजापूरचे नेते रवी राठी यांनी भाजपात प्रवेश केला. यापुढेही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख