Wednesday, January 8, 2025

मारकडवाडीत भाजपाची ईव्हीएम समर्थनार्थ सभा; गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि राम सातपुते यांची उपस्थिती

Share

मारकडवाडी : विरोधकांनी ईव्हीएमविरोधात राज्यभर आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) हे आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले आहे. याच दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) ईव्हीएमच्या (EVM) समर्थनार्थ मारकडवाडीत भव्य सभा आयोजित केली आहे.

या सभेला नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर, रयंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती आहे. भाजपाने जोरदार पाठिंबा व्यक्त करत, निवडणुका ईव्हीएमवरच व्हायला हव्या, असा ठाम पवित्रा घेतला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दुपारी मारकडवाडीला भेट देणार आहेत. मारकडवाडी सध्या दोन्ही बाजूंच्या राजकीय हालचालींमुळे चर्चेत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख