Saturday, September 7, 2024

अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी

Share

रायगड : २०२४ लोकसभा निवडणुकीत रायगडमधून अजित पवारांना (Ajit Pawar) दिलासा मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये सुनील तटकरे पराभूत होत असल्याचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष मत मोजणीच्या दिवशी रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. एकतर्फी निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या अनंत गितेंचा पराभव झाला आहे.

रायगडमधून महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे यांना 5 लाख 08 हजार 352 मतं मिळाली तर, उबाठा गटाचे नेते महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गितेंना 4 लाख 25 हजर 568 मत पडले आहेत. सुनील तटकरेंनी अनंत गितेंचा तब्बल ८२,७८४ हजारांच्या फरकाने पराभव केला आहे. तटकरेंच्या समर्थकांनी निवडणूक मतमोजणी केंद्राबाहेर विजयी जल्लोष करण्यास सुरुवात केली.

अन्य लेख

संबंधित लेख