Wednesday, December 4, 2024

महाराष्ट्रातील अराजकाची प्रयोगशाळा  

Share

मनोज जरांगे यांच्या निवडणूक निर्णय मुळीच आश्चर्यकारक नाही. धरसोड वृत्तीच्या या माणसाचा अंतस्थ हेतू मराठा समाजाला आरक्षण हा कधीच नव्हता. निवडणूकीच्या राजकारणापलिकडे या माणसाच्या मनात काहीतरी शिजत होते, हे आता पुरेसे सिध्द झाले आहे. हा हेतू समाजात विद्वेष पेरणी करून महाराष्ट्राला अराजकाकडे देण्याचाच होता आणि आहे. महाराष्ट्रापाठोपाठ देशभरात आरक्षणाच्या प्रश्नावर वणवा पेटविण्याचा हा डाव होता आणि आहे. सुदैवाने जरांग्यांना अपेक्षित यश आले नसले तरी सामाजिक नुकसान मात्र झाले आहे.

जरांगे बाबाने निवडणूकिच्या आधी मराठा-मुस्लिम- दलित असे समीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक असा प्रयोग पूर्वी अनेक वेळा अनेक राज्यांत झाला आहे. कांशीराम आणि प्रकाश आंबेडकर, ही त्याची ठळक उदाहरणे. कांशीराम यांना मर्यादित काळापुरता मर्यादित यश मिळाले. बाळासाहेब आंबेडकरांचा प्रयोग अनेक प्रयत्न करून फसला. हा प्रयोग मूलतः: फसला कारण, त्यांची वैचारिक बैठकच भारतीय समाजमानसाविरोधात होती आणि आहे.

गेल्या दशकात मराठा आरक्षण आंदोलनाने पुन्हा जोर धरला. सुमारे चार दशके मृतावस्थेत गेलेला हा प्रश्न पुन्हा जिवंत झाला. याचे कारण एका तात्कालिक घटनेत होते. ही घटना होती कोपर्डीची. या दुर्दैवी घटनेतील बळी मराठा समाजातील एक मुलगी होती आणि आरोपी दलित समाजाचे होते. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज रस्त्यावर उतरला आणि त्याने आंदोलनाचे स्वरूप धारण केले. या आंदोलनाची प्रमुख मागणी काय होती? ही मागणी होती Atrocity Act रद्द करण्याची. तोंडी लावायला आरक्षणाची मागणी करण्यात आली होती. आज प्रमुख मागणी आरक्षण बनली असून मूळ मागणीचे विस्मरणच झाले आहे. दलित समाज ही मागणी विसरलेला नाही.  जरांगे बाबा दलितांना बरोबर घेऊ इच्छितात. परंतु, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ग्रामीण भागात आजही  Atrocity Act  हा अजूनही एक अत्यंत नाजूक प्रश्न आहे. मराठा आणि दलित या दोन समाज घटकांमधे कमालीचे अविश्वासाचे वातावरण आहे. दलित समाजातील शिक्षित नवी पिढी या विषयावर अत्यंत आक्रमक आहे. मुळात हा कायदा केंद्राचा असून राज्य सरकारला त्यामधे काहीही वाव नाही. परंतु, महाराष्ट्रात या विषयावर काहूर माजवून देशभर या प्रश्नावर अराजक माजविण्याचे कारस्थान यामधे होते आणि आहे. ब्रिगेडी लोकांनी मूळ विषय बाजूला सारून मराठा ऐक्याचा फायदा घेत हे आंदोलन शब्दशः हायजॅक केले. हा इतिहास अगदी अलीकडचा असून दलित समाज तो विसरलेला नाही. परिणामी, जरांगे बाबांची ही युती कधीच व्यावहारिक नव्हती आणि त्यांना माघार घ्यावी लागली.

अशीच परिस्थिती मराठा मुस्लिम युतीची आहे. मुस्लिम समाजाविषयी सार्वत्रिक आणि टोकाचा अविश्वास आहे. ही परिस्थिती केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. मराठा समाजाची नाळ आजही ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. ग्रामीण भागातील मुस्लिम मुजोरीचा अनुभव आज ठळकपणाने घेतला जातो. लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, व्होट जिहाद यांचे प्रमुख बळी मराठा समाजच आहे. मराठा मुस्लिम अविश्वासाला अनेक ऐतिहासिक कारणे सुध्दा आहेत. मुस्लिमांनी आरक्षण मागणीला सक्रिय पाठिंबा देऊन हिंदू समाजात फूट पाडण्यासाचे ‘धर्मकृत्य’ केले आहे. जरांगे बाबाने मराठा समाजाला गृहित धरण्याची चूक केली. मराठा समाजाकडे आजही शेतजमिनीची मालकी आहे. भविष्यातील संभाव्य लॅंड जिहादचा पहिला बळी मराठा समाजच ठरणार आहे. 

दलित आणि मुस्लिम समाजाबाबतचे हे वास्तव जरांगे बाबालासुध्दा माहित आहे. हा गृहस्थ दुधखुळा नाही. तरीसुध्दा हा माणूस अवास्तव मागण्या धरसोड करीत चालवित आहे. यांचे सरळ कारण हेच आहे की या बाबाला महाराष्ट्रात अविश्वास, द्वेष, अशांतता निर्माण करून अराजक निर्माण करायचे आहे. आज महाराष्ट्रात जणू काही मराठा विरुद्ध मराठेत्तर असे वातावरण निर्माण झाले आहे. जरांगेसारख्या अराजकवादी वृत्तीचे हे यशच आहे. या अराजकवादी घटकांना गाडून टाकले ही काळाची गरज आहे. सामंजस्य आणि आस्थेच्या वातावरणात आरक्षणासारखे प्रश्न सुटू शकतात. द्वेष आणि शत्रुत्वाच्या वातावरणात प्रश्न जटिल होतात. जरांगेसारख्या अराजकवादी वृत्तीने महाराष्ट्र जणू काही एक प्रयोगशाळा केली आहे. हा प्रयोग देशभरात राबविण्याचा अराजकवाद्या़चे कारस्थान आहे. हा प्रयोग महाराष्ट्राच्याच मातीत गाडला जाणे हिताचे आहे. तेव्हा ‘सजग रहो’.

अन्य लेख

संबंधित लेख