Wednesday, December 4, 2024

विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी…विविध पक्षांच्या नेत्यांची राजकीय आतषबाजी

Share

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस, मराठवाड्यात सर्वाधिक तर कोकणात सर्वात कमी उमेदवार रिंगणात

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होईल. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी सर्वच पक्षांमधून बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. उमेदवारांचा प्रचारार्थ राजकीय नेत्यांच्या तोफाही धडाडणार आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अमर पाटील, सांगोला मतदारसंघात दीपक साळुंखे पाटील, बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महादेव कोगनुरे, उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रशांत इंगळे, शहर मध्य, पंढरपूर या ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. राज्यातल्या दोन प्रमुख महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात दिसून आले. महायुतीचे 36 तर महाविकास आघाडीचे 26 उमेदवार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणुशक्तीनगर, मानखुर्द इथल्या उमेदवारांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल गेले आहेत. तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा या आठ जागांवर परस्परांविरोधात उमेदवार उभे गेले आहेत. त्यामुळे, सोमवारनंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख