Tuesday, December 3, 2024

राज्यसभेसाठी उमेदवारी देताना संभाजी राजांचा अपमान केलात ही औरंगजेब फॅन क्लबची वृत्ती

Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मालवणमध्ये आंदोलनकर्ते आमनेसामने आले त्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. उध्दव ठाकरे यांचा हा औरंगजेबी फॅन क्लब आहे. आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाबाबत आंदोलन करीत आहेत त्यांनीच महाराजांच्या वशंजाकडे पुरावे मागितले होते, यांनीच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना राज्य सभेची उमेदवारी नाकारुन त्यांचा अपमान केला होता. हीच यांची औरंगजेब फॅन क्लबची वृत्ती आहे. असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.

उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता आणि प्रतिकांचा अपमानच वारंवार केला आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला गेले पण भगवान विठोबाच्या पायाला हात लावला नाही, तुळशी माळ गळयात घालून घेतली नाही. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सोडला तर कधीच ६ डिसेंबरला भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होण्यासाठी चैत्यभूमीवर गेले नाहीत ही यांची औरंगजेबी फॅन क्लब वृत्ती आहे, तसेच शिवाजी महाराजांच्या किल्यावर अतिक्रमणे झाली तेव्हा हे कधी बोलले नाहीत, विशालगडावर अतिक्रमणे हटवली तेव्हा यांना वेदना झाल्या, दर्गेमुक्त किल्ले झाले तेव्हाही यांना वेदना होत होत्या हीच यांची औरंगजेबी फॅन क्लब वृत्ती आहे, अशी टीका ॲड. शेलार यांनी केली.

अन्य लेख

संबंधित लेख