Thursday, November 28, 2024

बच्चू कडूंनी विश्वासघात केला, महायुतीत समावेश नको – राधाकृष्ण विखे पाटील

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला, अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा समावेश आहे. या पराभवानंतर बच्चू कडू राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा बुलढाण्याच्या शेगावमध्ये आयोजित करणार आहेत. या मेळाव्यात ते सत्ता, सत्तेबाहेर, झेंडा आणि सेवा याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत.

तथापि, त्याआधीच भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना महायुतीमध्ये समाविष्ट करू नये, अशी भूमिका घेतली आहे. विखे पाटील म्हणाले, “बच्चू कडूंनी महायुती सरकारला पाठिंबा दिला होता, परंतु त्यांच्यापासून विश्वासघात झाला आहे. त्यामुळे त्यांना महायुतीत सामील करून घेण्याची आवश्यकता नाही.”

मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता, विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे यांचा नाराजीचा मुद्दा नाही. त्यांनी म्हणाले, “पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल, तो मी मान्य करीन. आमची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांनाच आहे.” असे पण ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख