स्वर्गीय राजीव गांधी एकदा आपल्या संभाषणात म्हटले होते की केंद्र सरकार गावापर्यत १ रुपया पाठवतो तर त्यातले ८५ पैसे हे भ्रष्टाचाराची भेट चढतात, फक्त १५ पैसे गावापर्यंत पोहोचतात. काँग्रेस काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यामुळे मोठा वर्ग कर भरण्यास इच्छुक नव्हता आणि विकासाची चाल सुद्धा खूपच धीमी होती.
२०१४ नंतर आपल्या भारत देशात सामाजिक, आर्थिक आणि अध्यात्मिक बदल मोठ्या प्रमाणात होऊ लागले. केंद्रात मोदी सरकारने आणि महाराष्ट्रात भाजपा आणि नंतर महायुती सरकारने प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती वाढवली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने डायरेक्ट पैसा लोकांच्या खात्यावर जमा होऊ लागल्यामुळे भ्रष्टाचाराला लगाम लागायला सुरुवात झाली. अजूनही बरीच पावले उचलायची आहेत. पण सरकारची साफ निती बघता मागच्या १० वर्षात करदात्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे ज्यामुळे विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. एकूण आयटीआर ची संख्या २०१४ – १५ मध्ये ४.०४ कोटी होती. २०२३-२४ मध्ये ही संख्या ८. ६१ कोटींवर पोहोचली. २०१४-१५ मध्ये डायरेक्ट टॅक्स टू जीडीपी प्रमाण ५.५५ टक्के इतके होते. २०२३-२४ मध्ये हे प्रमाण वाढून ८. ६४ टक्के इतके झाले आहे. एकूण करदात्यांची संख्या २०१४-१५ मध्ये ५. ७ कोटी इतकी होती. हीच संख्या २०२३-२४ मध्ये वाढून १०. ४१ कोटी इतकी झाली आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात टॅक्स जास्त होता आणि विकासाची कामे कमी आणि ती ही खूप मंद गतीने व्हायची. भाजपा सरकारने टॅक्स कमी केला आणि विकासाची कामे आणि गती दोन्ही वाढवली. अजूनही बऱ्याच लोकांना वाटत की टॅक्स कमी व्हावा, जसे करदाते वाढतील तसा कर ही अजून कमी होईल. पण करदात्यांनी खुश झालं पाहिजे कारण त्यांचा पैसा खाली दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या विकास कामांसाठी वापरला जातोय.
१० वर्षातील काही विकास कामे
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे आणि त्यांना देशाच्या विकासाशी जोडण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे. भाजपा सरकारने १० कोटी लोकांना गॅस सिलिंडर, १२ कोटी लोकांना शौचालये, १४ कोटी लोकांना पाईपने पाणीपुरवठा, ११ कोटी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत, ४ कोटी लोकांना घरे, ६० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा. यात महाराष्ट्र भाजपा आणि महायुती सरकारनेही मोठी उडी घेतली.
२०१३-१४ मध्ये म्हणजेच पहिल्या ६७ वर्षात देशात ९१ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते, जे २०२३ मध्ये वाढून १,४५,००० किमी झाले. पंतप्रधान मोदींनी देशातील लॉजिस्टिक खर्च १० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य २०३० पर्यंत ठेवले आहे. जेणेकरून आपली उत्पादने जगामध्ये अधिक स्पर्धात्मक होतील. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा वेग ११.६ किमी प्रतिदिन वरून ३८ किमी प्रतिदिन झाला आहे, पूर्वी देशात चार हजार रोड ओव्हर ब्रिज (ROB) होते, आता ११ हजार आहेत. पूर्वी फक्त पाच मेट्रो शहरे होती, आता ही संख्या २० वर पोहोचली आहे, आज देशात विमानतळांची संख्या ७४ वरून १५० झाली आहे. अर्थव्यवस्था केवळ आकड्यांवर चालत नाही, अर्थव्यवस्था बदलण्यासाठी अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टी बदलण्याची गरज आहे आणि मोदी सरकारने आणि महायुती सरकारने गेल्या १० वर्षांत या पैलूवर काम केले आहे. रेल्वेचा भांडवली खर्च २ लाख कोटी रुपयांवरून ५ लाख २२ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे आणि बंदरे आणि पर्यटनातही तो दुप्पट झाला आहे. मागील सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च २ लाख कोटी रुपये होता, तो गेल्या महिन्यात मोदी सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात ११ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या आकडेवारीवरून देश कसा नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जात आहे हे दिसून येते.
२०१३-१४ मध्ये सरासरी जीडीपी ६.९ टक्के होती जी आज ८.४ टक्के आहे, दरडोई उत्पन्न ३८८९ यूएस डॉलर होते, जे आज जवळपास ६००० यूएस डॉलर झाले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य जे ७. ६ अब्ज यूएस डॉलर होते, ते आज २३ अब्ज यूएस डॉलरवर पोहोचले आहे, थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ३०५ अब्ज यूएस डॉलर्सवरून ६०० अब्ज यूएस डॉलर्सपर्यंत वाढली आहे आणि स्टार्ट-अपची संख्या ३५० वरून १ लाख १७ हजारपर्यंत वाढली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक २२ हजारांवरून ७३ हजारांपर्यंत वाढला आहे, जो आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेचा एक मोठा सूचक आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ८१ व्या स्थानावरून ४० व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतात ब्रॉडबँड वापरणारे लोक २०१३-१४ मध्ये ६ कोटी होते जे आज ९० कोटी आहेत. १० वर्षांपूर्वी आपण जगातील ११ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतो, आज भारत ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.
या काही उपलब्धी आहेत ज्यात महाराष्ट्राचा ही मोठा वाटा आहे आणि हे शक्य झालं डबल इंजिन सरकारमुळे. असचं जर प्रगती पथावर राहायचे असेल तर डबल इंजिन सरकार पुढेही असणं खूप आवश्यक आहे. म्हणून विचार करून मतदान करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र
पंकज जयस्वाल