Sunday, November 24, 2024

उद्धव ठाकरेंची ‘ना घर का ना घाट का’ अवस्था; भाजपा नेत्याचा सणसणीत टोला

Share

मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. याच मुद्द्यवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या भाजपा (BJP) नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर अशी खोचक टीका केली आहे.

केशव उपाध्येम्हणाले कि, पापा कहते थे, “बड़ा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा”

मगर मैं तो ये भी ना समझू
कि मेरी जगाह आखिर हैं कहाँ ???

सध्या दारोदार भटकणाऱ्या उद्धव ठाकरे यांची अवस्था अशीच झाली आहे. खुर्चीच्या मोहापायी भाजपाचा हात सोडून असंगाशी संग केला आणि मग आता त्यांनी यांची ना घर का ना घाट का अशी अवस्था करून सोडली. ज्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी जनतेचा कौल नाकारला त्याच मुख्यमंत्रीपदासाठी आज यांच्यावर दारोदार भटकायची वेळ आली आहे, असं ते म्हणाले.

काय नाही केलं लाचारीसाठी?? दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत असे सांगणाऱ्यांना आज सारख्या दिल्लीच्या वाऱ्या करून मॅडम समोर झुकायचे दिवस आले. सिल्व्हर ओक, १० जनपथ च्या पायऱ्या झिजवल्या. मात्र सगळीकडे निराशाच. शरद पवारांनी सांगितलं मुख्यमंत्रीपद नाही, काँग्रेसने सांगितलं की निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदावर चर्चा नाही, यांच्या सोनिया मॅडमने तर साधी भेट सुद्धा दिली नाही, असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.

ते पुढे म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा फक्त आडनाव लावल्याने येत नाही तर कर्तृत्वही तसेच ठेवावे लागते. आज हे असे दारोदार भटकत वंदनीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला, विचारांना काळिमा फासू नका,” असा सल्लाही यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

अन्य लेख

संबंधित लेख