पश्चिम बंगालमध्ये आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि तळा
पोलिस स्टेशनचे माजी प्रभारी अधिकारी अभिजित मंडल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडीत
देण्यात आली आहे. त्यांना काल सियालदह न्यायालयात हजर करण्यात आले. पुराव्यांमध्ये हस्तक्षेप
करणं आणि घटनेत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप त्यांच्यावर
ठेवण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपींना सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण
विभागाने काल रात्री अटक केली.
Share
अन्य लेख