छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील सोळा विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या खालील कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
१. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या डीज़ीटल डोम थिएटरपुनेटेरीयम (तारांगण) – लोकार्पण
२. प्री फॅब्रिकेटेड एसटीपी प्रकल्प लोकार्पण
३. हरित कचऱ्यावर (गार्डन/ग्रीन वेस्ट) वर प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण
४. पश्चिम विधानसभा मतदार संघ NO NETWORK भागात जलनिःसारण वाहिनी चे भूमीपूजन
५. एन-१२ सिडको येथे विशेष मुलांसाठी शाळा, उपचार व संशोधन केंद्राचे भूमीपूजन
६. शहरात विविध चौकामध्ये १४ स्मार्ट सिग्नल उभारण्याचे भूमीपूजन
७. शहरातील स्मशानभूमीचा सर्वांगिण विकासकामाचे भूमीपूजन
८. १२ कोटी अंतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण – भूमीपूजन
९. स्मार्ट सिटी अंतर्गत PM-e (इलेक्ट्रीकल बस) सेवा डेपो इमारतीचे भूमीपूजन
१०. मालमत्ता कर विभागामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाधारीत मालमत्ता कर नियंत्रणकक्षाचे लोकार्पण
११. दिव्यांगक्षरे चालविण्यात येणा-या सक्षम पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे लोकार्पण
१२. मिटमिटा मनपा शाळेच्या इमारतीचे भूमीपूजन
१३. नवीन खरेदी करण्यात आलेल्या जेटींग मशीन, व्हॅक्यूम मशीन,स्वीपींग मशीनचे लोकार्पण
१४. स्मार्ट डिजीटल बस सेवा उपलब्ध करण्याच्या हेतूने एकात्मिक वाहतुक व्यवस्थापनसंचालन प्रकल्पाचे लोकार्पण
१५. झोन क्र. ४ मनपा प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण
१६. मनपा शाळा शास्त्रीनगर, गारखेडा येथे सिंथेटिक टर्फचा लोकार्पण.