पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी चंदीगडमध्ये NDA मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. पंतप्रधान मोदी म्हणाले की बैठकीत सर्व नेत्यांनी सुशासनाच्या पैलूंवर आणि लोकांचे जीवन सुधारण्याच्या मार्गांवर विस्तृत चर्चा केली. पीएम मोदी पुढे म्हणाले की, आमची एनडीए आघाडी देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आणि गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1846946693444415773
जेपी नड्डा म्हणाले की, आजच्या महत्त्वाच्या बैठकीला 17 मुख्यमंत्री आणि 18 उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली आणि बैठकीत 6 प्रस्तावांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले. मोदींच्या धोरणांमुळे हरियाणामध्ये पक्षाच्या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत पहिला प्रस्ताव ठेवला होता. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना शेतकरी, युवक आणि खेळाडूंचा पाठिंबा मिळाला. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2025 मध्ये ‘संविधानाचा अमृत महोत्सव’ साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता, जो एकमताने मंजूर करण्यात आला.
एनडीएच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी शासनाच्या मदतीने लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत यावर भर दिला आहे. मोदी म्हणाले की, भारतानेही लोकाभिमुख, प्रो-गव्हर्नन्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि ते पुढे नेले पाहिजे.