Monday, December 2, 2024

काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका

Share

Baramati Lok Sabha : ‘ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठणकावले. पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील भोर येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भोरमधील नागरिकांना सर्वांगीण विकासासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं.

‘आपल्या सरकारने महिलांचा सन्मान वाढवणारे अनेक निर्णय घेतले. आजपासून माता भगिनींशी संबधित एका ऐतिहासिक निर्णयाची राज्यात अंमलबजावणी सुरु झाली. शासकीय कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या नावात आधी आईचे नाव नंतर वडीलांचे नाव लावले जाणार आहे. आपले सरकार मुलगी, सून, पत्नी असा कोणताही भेदभाव करत नाही’ असं ते यावेळी म्हणाले.

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समजाला आरक्षण दिले. ते हायकोर्टामध्ये टिकले, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झाले. आपले सरकार जे होणार असेल तेच बोलणारे आहे, जे होणार नाही ते बोलणार नाही. खोटी आश्वासन आपण कधी दिली नाही आणि देणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हायकोर्टाने आक्षेपाची याचिका फेटाळली असून पुढे कोर्टात हे आरक्षण नक्की टिकेल’, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख