Sunday, May 26, 2024

रॅली दरम्यान ठाकरे गटाकडून घोषणाबाजी: एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

Share

नाशिक : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात मतदान असलेल्या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होत असून, आतापर्यंत चार टप्पे पार पडले आहेत. पाचव्या टप्प्यात १३ जागांसाठी मतदान होत असून, यात उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई, ठाणे, पालघरमधील एकूण १३ जागांवर २० मे रोजी मतदान होईल. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा नाशिकमधील (Nashik) एक व्हिडीओ कमालीच व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते रॅलीदरम्यान आमने सामने आले होते. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याला एकनाथ शिंदेंनी प्रचार रथातून धनुष्यबाण सोडत असल्याचा इशारा करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना  प्रत्युत्तर दिलं आहे.

नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रोड शो आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, नाशिक दौऱ्यावर असताना शिंदेंची रॅली जात असतांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी “पन्नास खोके, एकदम ओके” म्हणत जोरदार घोषणाबाजी करत मशालीचे चिन्ह दाखवत होते. यावेळी शिंदे यांनी प्रचार रथातून धनुष्यबाण सोडत असल्याचा संकेत देत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

अन्य लेख

संबंधित लेख