मुंबई : मुंबईतील (Mumbai) विधानभवनात महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी रविवारी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्व ११ सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी शपथ दिली. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नवीन सदस्यांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde), सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर आणि राजेश विटेकर या ११ सदस्यांनी शपथ घेतली.