Saturday, July 27, 2024

अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार

Share

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) काल निकाल लागला आणि यात महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधानी राहावे लागले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (MVA) ३० जागांवर विजय मिळवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी महायुतीच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी घेत पदातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आज अमित शहांशी (Amit Shah) त्यांची फोनवर चर्चा झाली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर मुक्कामी जात आहेत. उद्या भाजपची संसदीय पक्षाची बैठक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आहेत. आज ते दिल्लीत नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या मुक्कामी दिल्लीतील दौऱ्यात ते कोण-कोणत्या नेत्यांच्या भेटीगाठी करतात आणि काय-काय निर्णय होतात याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष असेल.

दुसरीकडे, देवेंद्र फडणीस यांनी पदातून मुक्तता करण्याची मागणी करताना त्यांच्या भूमिकेला मात्र, राज्यातील नेत्यांनी विरोध करत पराभवाची सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं फडणवीसांनी सरकारमध्येच राहावं अशी भूमिका घेतली आहे. भाजपचे आमदार, नेते, पदाधिकारी यांचीही भूमिका तशीच आहे. भाजपचे अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मनधरणीचा प्रयत्न करत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख