Sunday, October 13, 2024

…असे आहेत हे हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते..; व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाची धूम चालू आहे. यातच महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीचा लवकरच घोषित होईल असं दिसतंय. महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना दिसत आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) या सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना निशाण्यावर घेत आहेत. आता त्यांनी ‘एक्स’ वर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे २ व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंना निशाण्यावर घेतले आहे.

चित्रा वाघ यांनी पहिला व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांचा टाकत म्हणाल्या, ‘आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस गणेश भक्तांमध्ये मिसळून ढोल वाजवण्याचा मनस्वी जल्लोष करून आनंदाची उधळण करीत आहेत.’ असे त्या म्हणाल्या.

तर, उद्धव ठाकरे यांचा दुसरा व्हिडिओ टाकत म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांना आरती हातात घेता येत नाही, आणि सांगतात, एक तर तू, नाही तर मी !..असे आहेत हे हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते.., असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंना कडवट टोला लगावला आहे. आणि म्हणाल्या आरती हातात घेण्यास या आद्य पुरस्कर्त्यांनी नकार देतात रश्मी वहिनींच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव मात्र अवश्य पाहा, बरं का ! असं म्हणत मिश्किल टोला लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख