Sunday, October 13, 2024

…तर देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही

Share

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण होणार यावर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे. महायुतीनं विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढू मात्र मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतर ठरवण्याचं सूत्र निश्चित आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली.

नागपुर येथे चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात आमदार परिणय फुके बोलत होते. “फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहे, तरी ते ही एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार, फडणवीस यांचं महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहेत. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला. तर फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असे परिणय फुके म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख