Wednesday, December 4, 2024

सज्जाद नोमानींवर टीका; तर, वोट जिहाद’मागे पवार, ठाकरे, गांधींचे हात? फडणवीसांचा सवाल

Share

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांच्यावर टीका करत, त्यांच्या विधानांचा निषेध व्यक्त केला आहे. . “जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये ते लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्यांना शोधून बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. त्याशिवाय, ते मत जिहादचे (Vote Jihad) आवाहन करत असल्याचेही स्पष्ट होते,” असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी पुढे काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांवर टीका करत म्हटले की, “वोट जिहादसाठी आमचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी आहेत, कसले राजकारण चालू आहे? समाजात फूट पाडण्याचे काम करणारे? याआधी असे ध्रुवीकरण कधीच पाहायला मिळाले नाही. पराभवाच्या भीतीने काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी देशातील सामाजिक एकोपा भंग करण्याचा प्रयत्न असून देशामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख