पुणे : विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर त्यांना केवळ वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकानावर केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना काँगेसवर हल्लाबोल केला. वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मनमानीला चाप लावण्यासाठी गुरूवारी संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. मात्र, विरोधकांकडून या विधेयकाला विरोध करण्यात येत आहे.
“मागच्या काळात महाराष्ट्रात वक्फचा घोटाळा झाला. यावेळी वक्फच्या जमिनी कोणी लाटल्या, त्यात काँग्रेसचे कोणते नेते होते, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्याचा अहवालही समोर आला आहे. विरोधकांना वक्फशी काहीही देणंघेणं नाही. तर त्यांना त्या जमिनीशी देणंघेणं आहे. त्या जमिनी कशा लाटता येतील हा त्यांचा प्रयत्न आहे,” असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
“या विधेयकामुळे पारदर्शकता येणार होती. त्यामुळे जमिनी लाटणाऱ्यांना याची अडचण होणार होती. वक्फचा कारभार असाच सुरु राहावा जेणेकरून त्यांना जमिनी लाटता येईल, असं विरोधकांना वाटतं. त्यामुळे त्यांनी त्याचा विरोध केला. पण हे विधेयक समितीकडे आहे आणि त्यावर योग्य निर्णय होईल,” असेही ते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- शहरी नक्षलवाद्यांना हादरा देणारा ‘जनसुरक्षा विधेयक’ आता महाराष्ट्रात लागू
- दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण: ‘पुरोगामी’ विचारवंतांचा दुटप्पीपणा
- औषधांचा तुटवडा थांबणार! खरेदी प्रक्रियेत येणार ‘पारदर्शकता’
- 398 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2806 उपकेंद्रे होणार आधुनिक – मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- ग्रुमिंग गँगची भारतीय पार्श्वभूमीवर