Thursday, October 10, 2024

मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

Share

नागपूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला. त्या विषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेतली व त्यातले बारकावे समजून सांगितले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान (Constitution) होत, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला”. असं विधान फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर केलं.

‘मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल’ असा प्रचार वारंवार काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. त्याविषयी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला”. मोदींची निवड एनडीएचा प्रमुख म्हणून झाली, त्यावेळी सर्वप्रथम त्यांनी भारताच्या संविधानाची पूजा केल्यानंतर आपलं पद स्वीकारल. कुठल्याही ग्रंथपेक्षा ‘संविधान’ जास्त महत्वाचे आहे. मागील दहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी संविधानच सरक्षण केलय. संविधान बदलण्याचा विचार सुद्धा केला नाहीये. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख