Friday, April 4, 2025

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’

Share

धारावी : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सकाळपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक धारावीत गेलं असता तेथील नागरिकांनी बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केल्याचं समोर आलं. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला. भाजपाचे आमदार आणि नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया दिली. “मी वारंवार बोलतोय. या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशात, महाराष्ट्रात शरीया कायदा लागू करायचा आहे” असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “एकाबाजूला संविधान बचाव आणि कायद्यानुसार ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो हे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ते तोडण्यासाठी टीम आली. त्यावेळी तिथल्या जिहाद्यांनी अतिक्रमण तोडू दिलं नाही मुंबई पालिकेच्या गाड्या पण फोडल्या. ही जी काय अरेरावी, दादागिरी आहे, ती त्यांच्या पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन दाखवावी” असं प्रक्षोभक वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

अन्य लेख

संबंधित लेख