Monday, June 24, 2024

डोंबिवली MIDC दुर्घटनाप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

Share


Dombivli MIDC : डोंबिवली ‘एमआयडीसी’ (Dombivli MIDC) येथील फेज २ मधील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 65 हून अधिक कामगार गंभीर रित्या जखमी झाले आहेत. काल रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफच्या टीमकडून येथे शोधमोहिम राबवण्यात येत होती. आज, शुक्रवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान याप्रकरणी अमुदान या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती आणि मलय मेहता हे दोघेही घटनेच्या वेळी घटनास्थळी नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काल दुपारी झालेल्या बॉयलरच्या स्फोटामुळे भीषण आग लागून दुर्घटना घडली. पोलीस सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख