Monday, June 24, 2024

डोंबिवली MIDC मध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; अनेकजण जखमी

Share

महाराष्ट्र : डोंबिवली MIDC मधील फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी तीन बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटानंतर (Dombivli MIDC Blast) लगेचच कंपनीला आग लागली. त्यात 20 ते 25 कामगार होरपळून गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनीजवळ ह्युंदाई कंपनीचे शोरूम आहे. या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे. या आगीनंतर केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना धोका निर्माण झाला आहे. या स्फोटाचे नेमके कारण आणि तीव्रता अद्याप समजू शकलेले नाही.

अन्य लेख

संबंधित लेख