जळगाव : भाजपच्या (BJP) वाटेवर असलेलले आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद नोंद केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केलेला आहे. धमकीचे फोने अमेरिका आणि उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली आहे. त्यात काही गंभीर प्रकरण आढळल्यास गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
NB मराठीच्या WhatsApp चॅनल फॉलो करा : https://whatsapp.com/channel/0029VaWO0HLCRs1iZlueP42F