‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याची घोषणा चित्रपटाची प्रमुख कंगना रणौतने केली आहे. राणौत यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेला हा चित्रपट, भारतीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त काळावर आधारित आहे. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनमत विरोधात जात आहे असे दिसताच सत्ता टिकविण्यासाठी घोषित केलेल्या आणीबाणीच्या कालखंडावर या चित्रपटाची कथा केंद्रित आहे.
आणीबाणीच्या २१ महिन्यांच्या काळात घडलेल्या अत्याचाराच्या घटना आणि विरोधी विचारांचे राजकीय दमन या चित्रपटाद्वारे नव्या पिढीला कळेल. चित्रपटात स्वतः कंगना रणौत यांनी इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त विषयांपैकी एक मेगा-बजेट सिनेमा म्हणून ओळखला जात आहे.
चित्रपटाच्या कलाकारांमध्ये अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे आणि दिवंगत सतीश कौशिक यांचाही समावेश आहे. झी स्टुडिओ आणि मणिकर्णिका फिल्म्स निर्मित, ‘इमर्जन्सी’ ६ सप्टेंबर २०२४ रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
१४ ऑगस्ट २०२४ रोजी ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये इंदिरा गांधीच्या भूमिकेत कंगना रणौतच्या उत्कट कामगिरीची झलक मिळण्याची अपेक्षा आहे. कंगनाचे चाहते आणि समीक्षक सुद्धा ट्रेलरच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.