Friday, September 20, 2024

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ

Share

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात १ कोटी ५९ लाख रुपये संकलन झालं होतं, तर यंदा ही रक्कम १ कोटी ७५ लाख रुपये असल्याचं सरकारी आकडेवारी दाखवते.

जीएसटी अंतर्गत करदात्यांना परतावा देण्यापूर्वी केंद्र सरकारने ३० हजार ८६२ कोटी रुपये जमा केले, तर राज्यांनी ३८ हजार ४११ कोटी रुपये जमा केले आहेत. आयात आणि आंतरराज्य विक्रीवरच्या एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचं संकलन ९३ हजार ६२१ कोटी रुपये इतकं होतं.

अन्य लेख

संबंधित लेख