Sunday, May 26, 2024

…हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत – देवेंद्र फडणवीस

Share

महाराष्ट्र : मुंबईवरील 2611 हल्ल्याच्यावेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा अतिरेक्यांची बंदुकीतील नव्हती, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे.

“विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आणि देशातील न्यायालयावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. सुरुवातीला पाकिस्तानची जनता बोलत होती कि, कसाबने काही केलेलं नाही पण कसाब आमचा रहिवाशी होता हे पाकिस्तानला (Pakistan) देखील मान्य करावं लागलं. आणि त्यानेच अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत.२००८ साली मुंबईवर हल्ला झाला तेव्हापासून २०१४ पर्यंत महाराष्ट्रात आणि देशात कॉंग्रेसचं सरकार होतं. आज विरोधी पक्ष नेते अशी वक्तव्य करत आहेत ज्यामुळे याचा पाकिस्तानला फायदा होणार आहे”, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमाशी बोलतांना केलय.

अन्य लेख

संबंधित लेख